Top News

रांगोळीचा "स्वामी" हरपला.

प्रसिद्ध रांगोळीकार "स्वामी साळवे" यांचे कोरोनाने दुःखद निधन.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- अंत्यत हलाखीचे परिस्थितीत शिक्षण घेत कला शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना आपल्या कुंचल्यातून,आणि रांगोळीतून अवर्णनीय रांगोळी तथा चित्र साकारून नावलोकीक मिळविला विविध पुरस्काराने गौरविण्यात आले त्याच्या या कलात्मक स्वभावामुळे विद्यार्थीसह सर्वाचा लाडका असलेले स्वामी साळवे यांचे कोरोना काळातील जाणे सर्वांसाठी दुःखदायक ठरला आहे त्याचे अश्या मृत्यूने एक चांगला ग्रामीण कलाकार, मित्र, शिक्षक असलेला सवंगडी हरपला अशी भावणीक प्रतिक्रिया तोहोगाव वासियाच्या व्यक्त होत आहे
मूळचे गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील स्वामी साळवे कला शिक्षक म्हणून कोठारी येथिल जनता कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते दरम्यान तीन दिवस अगोदर अचानक तब्बेत बिघडली म्हणून त्यांची तपासणी केली असता आक्सिजन कमी असल्याने तात्काळ चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु चंद्रपुरात त्याला बेड मिळाला नाही म्हणून तेलंगणातील मांचेरीयल येथे भरती करण्यात आले होते दरम्यान त्याचे शुगर लेव्हल ही कमी झाले आणि दुर्दैवाने दिनाक 18 एप्रिल रोजी रात्री प्राणज्योत मालविली,

ही बातमी कळताच नातलग शिक्षक वृंद,आणि मित्र परिवाराना तीव्र दुःख झाले त्यांचे पश्चात लहान 2 मुले पत्नी आई भाऊ असा आप्त परिवार आहे. लहानपणा पासूनच चित्र काढण्याची छंद असणाऱ्या स्वामी ने कला शिक्षण घेतले आणि कोठारी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी मिळविली तरीपण विविध स्पर्धेतून रांगोळीतून व कुंचल्यातून हुबेहूब जिवंत दिसावा असे चित्र काढीत होते त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले होते थ्रीडी चित्र प्रकार काढण्याची सुरवातही केली होती परंतु नियतीने वेगळाच डाव मांडला आणि मृत्यू ओढविला, रांगोळीतून, कुंचल्यातून चित्र काढणारा ग्रामीण भागातील “रांगोळीचा स्वामी” हरपला अशी प्रतिक्रिया देत मित्र व शिक्षक परिवारनी भावनिक श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने