Top News

विहिरीत पडून युवकाचा दुदैवी मृत्यू.

पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील सुरज कालीदास पेंदोर वय १८ वर्षीय यूवकाचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली

📹व्हिडिओ न्यूज पहा.......
👇👇👇👇👇
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक यूवक नेहमी प्रमाणे पाणि आणायला घराशेजारच्या विहिरीवर गेला. अचानक त्याला भोवळ आल्याने तोल जाऊन विहिरीत पडला. परंतु जवळ कुणी नसल्याने त्याच्या मदतीस कुणी जाऊ शकले नाही, काही वेळाने गावातील महीला पाणी आणायला गेल्या असत्या त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

या घटनेची माहीती भ्रमणध्वनी वरून तात्काळ पोंभूर्णा पोलीसांना देण्यात आली. पोंभूर्णा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्यात आला शव विच्छेदना साठी गोंडपिपरी येथील सामान्य रूग्नालयात पाठवीले असून पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आहे. पेंदोर कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने