जाहिरात... Advertisement... विज्ञापन

होय, "मी स्मशानभूमी बोलतेय!"

सोशल मीडियावर व्हायरल होतोय हृदयस्पर्शी संदेश.
हे माणसा! सर्व प्राणीमात्रांमध्ये तू सर्वात हुशार प्राणी म्हणून समजला जातो...... तुला भावना व्यक्त करता येतात...... भूक-तहान लागली की तुला सांगता येते..... तू सर्व ईच्छा पूर्ण करू शकतोस...... मात्र कोरोनाचं आक्रमण परतवून लावण्यास असमर्थ ठरतोय..... दवाखान्यात उपचार घेण्यासाठी धडपड करावी लागते...... यातना सोसावी लागते...... पैसा असून सर्वकाही शून्य...... आज तुझी केविलवाणी अवस्था पाहून वेदना होतात..... होय, "मी स्मशानभूमी बोलतेय".... कोरोनामुळे मृत्युदर वाढला आहे.
पूर्वी प्रेतयात्रा काढली जायची. आता 'प्रेतांची यात्रा' पाहून काळीज धडधडायला लागतं. कोरोनामुळे मरण आलेल्या मृत माणसांना थेट दवाखान्यातून माझ्याकडे आणले जाते. अंत्यसंस्कार करण्यासाठी...... अरे, ते अंत्यसंस्कार कुठले? तुझं शरीर जाळण्यासाठी..... जीवंतपणी तू अनेकवेळा रांग अनुभवली असेल. मेल्यावरही तुला रांगेत पाहून खरंच जीव कासावीस होतो.. तुझ्या आप्तेष्टांच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा पाहून मन गहिवरून येतं.
बाहेरून घरी आल्यावर तुला बिलगणारी मुलं तुझा चेहरा सुद्धा पाहू शकत नाही.... शब्द नाही रे व्यक्त होण्यासाठी..... परंतु आज मन मोकळं करावसं वाटतय..... खरंच किती विचित्र...... किती भयावह परिस्थिती! कोरोनाच्या नावानं चांगभलं, म्हणत तुझ्या पैकी काहीजण लुटमार करताहेत...... साठमारी केली जाते...... जो तो प्रेतांच्या अग्नी ज्वालांवर पोळी शेकण्याचा प्रयत्न करतोय...... कुठल्याच बाबतीत गांभीर्य नाही...... पुढारी लोकं टीका टिप्पणीचा खेळ खेळण्यात रमली आहे..... यात चांगल्या माणसाचं मरण होतंय...... आणि मरणानंतरही त्याला यातना सहन कराव्या लागत आहे..... प्रेतांचा सडा पाहून माझे अश्रूही आटले आहे..... अरे माणसा आता तरी सावध हो.. जागा हो... घरीच राहशील.. तेव्हाच सुरक्षित राहशील.
कोरोना विषाणूची दहशत वाढतच आहे. अनेक नागरिक गांभीर्याने घेत नाही. मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाच्या रांगा पाहायला मिळतात. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी आवाहन केले जात आहे. सामाजिक विषयावर लिखाण करणारे सुनील आरेकर यांनी शब्दांकित केलेला होय, "मी स्मशानभूमी बोलतेय!" हा हृदयस्पर्शी संदेश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत