Click Here...👇👇👇

खास. अशोक नेते यांच्या प्रयत्नाने सावली कोविड केअर सेंटरला मिळाले 1 ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन. Chandrapur

Bhairav Diwase
1 minute read
खासदार अशोक नेते यांनी घेतली सावलीतील कोविड स्थितीची माहिती.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सावली:- गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी मागील आठवड्यात सावली तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला असता सावली कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता असून पुन्हा 150 बेडची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले होते. त्यावेळी खासदार अशोक नेते यांनी एक मिनी व्हेंटिलेटर दिले तसेच ऑक्सिजन मशीन व बेडची पूर्तता लवकरच करण्याचे आश्वासन दिले होते. खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे मागणी केली व ऑक्सिजन कान्सट्रेटर चा पुरवठा होताच एक मशीन सावली कोविड केअर सेंटर ला दिली व याचा योग्य वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे सूचना केल्या.
 
        याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोबाडे व डॉ धुर्वे यांच्याकडे ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन सुपूर्द केली. यावेळी सावली चे तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, तहसीलदार परीक्षित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बोबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ धुर्वे, बीडीओ निखिल गावड़े,नायब तहसीलदार सागर कांबडे,पोलिस उपनिरीक्षक चिचघरे,डॉ. विवेक यमजलवार,सोशल मीडिया प्रमुख आनंद खजांची,व अधिकारी उपस्थित होते.
   
       यावेळी खासदार अशोक नेते यांनी सावली तहसील कार्यालयात कोरोना स्थितीबाबतची माहिती जाणून घेतली व 150 बेड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.तसेच सावली तालुक्यात पुन्हा 3 लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच जीबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन कोविड केअर सेंटरची पाहणी केली. व याठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.