Bhairav Diwase. May 21, 2021
गडचिरोली:- राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी, 8 जणांचे मृतदेह जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहेत.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत शुक्रवारी सकाळी तब्बल 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.
याशिवाय काही जखमीही झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली. पोलिसांचे सी-60 पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही चकमक उडाली. जंगल परिसरातून अद्याप 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.