दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे 170 पॉझिटिव्ह.




(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शासनाने वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीसुद्धा अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनानी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी सुरु केली. आतापर्यंत ३२३८ जणांची ॲंटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी १७० पॉझिटिव्ह आढळून आले. तरीसुद्धा अनेकांचे विनाकारण घराबाहेर पडणे सुरूच आहे.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याला आढा घालण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु, युवा वर्ग प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोणतेही काम नसताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात विशेष मोहीम राबवत चौका-चौकात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट ॲंटिजन तपासणी सुरू करण्याची मोहीम राबवली.
आतापर्यंत जिल्ह्याभरात ३२३८ जणांची ॲंटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये १७० पॉझिटिव्ह आढळून आले. यासोबतच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र अद्यापही अनेकात बदल दिसून येत नसून विनाकारण फिरणे सुरूच असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याभरातच राबवली मोहिम.....

विनाकारण फिरणाऱ्यांची ॲटिजन चाचणी करण्याची मोहिम जिल्ह्याभरात राबविण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात पोलिसांची चमू आरोग्य विभागाच्या पथकासह तैनात असते. यावेळी विनाकारण फिरणारा आढळून आल्यास त्याला थांबवून त्याची ऑन द स्पॉट तपासणी करण्यात येते. आतापर्यंत १७० जण पॉझिटिव्ह आढळले.

कारणे तीच, कोणाला दवाखाना तर कोणाला भाजीपाला.....

विनाकारण फिरणाऱ्यांची कारणे ठरलेली आहेत. बाजारात भाजी खरेदीसाठी जात आहेत. किराणा आणण्यासाठी जातोय. दवाखान्यात काम आहे, अशा स्वरुपाची कारणे सांगितली जातात. सर्वाची कारणे जवळपास सारखीच असतात. ज्याची कारणे खरी असतात त्यांना सोडण्याच येते. तर ज्याची खोटे वाटतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने