Top News

18 वर्षा वरील लसीकरण (वॅक्सीन ) त्वरित सुरु करा आणि म्यूकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच उपाययोजना करा.

नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष भाजयुमो विशाल निंबाळकर यांची मागणी.
Bhairav Diwase. May 23, 2021
चंद्रपूर:- 18 वर्षा वरील लसीकरण गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. तिसऱ्या लाटेचा प्रादूरभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या साठी लसीकरण त्वरित सुरु करा.देशात गेल्या तीन-चार दिवसात कोरोना रुग्णाच्या संख्येत काही अंशी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाला कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांना बरे करण्यास मोठे यश लाभले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील रुग्ण वाढ व मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्यूकरमायकोसीस अर्थात "काळी बुरशी"ने सर्वत्र शिरकाव केला आहे.
राज्यात मोठया प्रमाणात म्यूकरमायकोसीस चे रुग्ण असल्याची माहिती वृत्तपत्राच्या व प्रसारण माध्यमातून प्राप्त होत आहे,यातून चंद्रपुर जिल्हा सुटला नाही.या नवीन आजाराने अनेकांची चिंता वाढविली आहे.
कोरोनाचे तिसरे रूप ठरलेल्या ब्लॅक फंगस नंतर आता व्हाईट फंगस हा आजार पण बळावत आहे. ब्लॅक फंगस पेक्षाही व्हाइट फंगस मानवी शरीरालाला धोकादायक असल्याबाबतची माहीती वैद्यकीय सल्लागारांनी दिली आहे. तेव्हा म्यूकरमायकोसीस ब्लॅक व व्हाईट फंगस या आजारापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यास राज्यातील आरोग्य विभागाने पूर्व नियोजन करून म्युकरमायकोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वीच उपाययोजना कराव्या अशी मागणी जिल्हाध्यक्ष भाजप युमो विशाल निंबाळकर यांनी व शहर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी सिव्हिल सर्जन निवृत्ती राठोड साहेब आणि( dho )साहेब यांना विनंती केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने