पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील घटना.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील एका 30 वर्षीय युवकांने गावातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हि घटना 11 वाजताच्या सुमारास घडली. मृतक युवकाच नाव गितेश मारोती कुत्तरमारे असे आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल होऊन मृतदेहाला विहीरीतून बाहेर काढून शवविच्छेदनकरिता पाडण्यात आले आहे. मृतांच्या पश्चात वडील, भाऊ आहे. गितेशने आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट असून पोंभुर्णा ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार राजकुमार करीत आहेत.