चार राईस मिल मालकांनी मिळुन दिले 50 बेड.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- कोरोनाच्या रूग्णांसाठी बेडची संख्या दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यावर तालुक्यातील चार राईस मिल मालक एकत्र आले. त्यानी कोवीड सेंटर साठी 50 बेड उपलब्ध करून दिले. व्यापाराच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरात कौतुक केले जात आहे.

सावली तालुक्यातील कोरोना बांधितांची संख्या वाढत चालली आहे. कोविड बाधितांवर प्रशासन उपचार करित आहे. पाथरी, निफंद्रा या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. जिबगाव येथे विलगिकरनाची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. या परीस्थितीत तहसिलदार यांनी मदतीचे आवाहन केले आहे. आवाहनाला प्रतिसाद देत चार राईस मिल मालकानी 50 बेडची व्यवस्था करुन दिली आहे. संतोष तंगडपल्लीवार यांनी 12 बेड स्वप्निल भांडेकर यांनी 12 बेड प्रशांत चिटनुरवार यांनी 12 बेड सदांनंद बुटोलिया यांनी 12 बेड दिले. तर एकत्रित 2 बेड प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने