वडिलांच्या हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक.

Bhairav Diwase
वडिलांच्या हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील सिंधी येथील काल झालेल्या मुलाकडून पित्याच्या हत्या प्रकरणात विरुर पोलिसांनी पुन्हा एका सिंधी येथील युवकास अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या दोन्ही आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिडाली असल्याची माहिती मिळाली आहे.
जमीन विक्री करून मिळालेल्या रक्कमसाठी घरात रात्री अकरा वाजता वाद होऊन सिंधी येथील निखिल धानोरकर याने आपल्याच जन्मदात्या वडील तिरुपती धानोरकर यांची (बैलबंडीची उभारी) काठीने रागाच्या भरात डोक्यावर जबर वार केले यात तिरुपती याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे भयभीत होऊन निखिलने मित्र भाऊराव टेकाम याला पाचारण करून झालेल्या घटनेची माहिती दिली व प्रकरण सावरसावर करण्यासठी त्याची मदत मागितली तेव्हा निखिल जवळ असलेली हिरो स्पेलण्डर मोटार सायकल क्र MH-34 S-1362 या वाहनावर मृत्युदेह घेऊन विरुर रेलवे स्टेशन जवळील रेल्वे रुळावर त्याच रात्री आणून टाकले व आत्महत्या केल्याचा देखावा केला. मात्र विरुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा विभागाने परिस्थिती चे सूक्ष्म परीक्षण करून अगदी दोन तासातच सदर प्रकरणाचा छडा लावला.
सदर प्रकरणी दोघांनाही अटक करून 302, 201, 34 भादवी गुन्ह्या अंतर्गत गुन्हा नोंदविला असून विरुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार कृष्ण कुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदानंद वडतकर पीएसआय विरुर, दिवाकर पवार हवालदार, नरगेवर हवालदार, शिपाई काळे, शिपाई मिलमीले, मुंडे यांनी सदर कारवाही केली.