Top News

दुर्गापुर आरोग्य केंद्रावर पहिला व दुसरा लसीकरण डोस अखंड दररोज मिळण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन

बळीराजा आता जागा हो संघटनामार्फत निवेदन सादर


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- दुर्गापुर ऊर्जानगर ग्रामपंचायत राज्यांमध्ये मोठी ग्रामपंचायत आहे अंदाजे लोकसंख्या 42000 आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणारी व इतर क्षेत्रात काम करणारे आणि झोपडपट्टी मध्ये राहणारे सामूहिक श्रम करणारे अनेक नागरिक आहेत. त्यामुळे बहुतेक घरी दोन ते तीन रुग्ण कोरोना बाधित आहे. आजूबाजूला ग्रामीण भाग व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक नागरिकांनी लसीचा अभावी लसीकरण केलेले नाही आहे.
येथील नागरिक लस घेण्याकरिता शहरांमध्ये लसीकरण केंद्रावर गेले असता तुम्ही ग्रामीण भागातले आहे आम्ही तुम्हाला लस देऊ शकत नाही. असा प्रकार याठिकाणी पाहायला मिळत आहे.

दुर्गापूर आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून येथील नागरिकांना लसीकरणसाठी घावपड होणार नाही. सोबतच काही अशिक्षित नागरिक लस घेण्यास घाबरतात त्यांना लसीकरण संदर्भात महत्व पटवून देण्याची विनंती येथे बळीराजा आता जागा हो या संघटनेच्या माध्यमातून नंदू मोंढे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने