ऑक्सिजन लिक्विड प्लांटचे भविष्यातही फायदे; जिल्हा केंद्रांवर एक तरी प्लांटची आवश्यकता!
गडचिरोली:- सारख्या मागास जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्लांट निर्माणाधीन आहेत परंतु जिल्ह्यामध्ये एकही लिक्विड ऑक्सीजन प्लांट मंजूर नाही त्यामुळे शासनाने तातडीने गडचिरोली स्त्री व बाल रुग्णालय येथे ऑक्सिजन लिक्विड प्लांट ला मंजुरी द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
गडचिरोली जिल्हा हे मोठे केंद्र आहे परंतु या ठिकाणी एकही ऑक्सीजन प्लांट नाही हवेतून ऑक्सीजन प्लांट निर्मिती करण्याचे काम निर्माणाधीन आहे. परंतु एकही लिक्विड ऑक्सीजन प्लांट नाही त्यामुळे ऑक्सिजन लिक्विड प्लांटची नितांत आवश्यकता आहे. कोरोना गेल्यानंतरही या प्लांटची भविष्यकाळात रूग्णांना मोठी मदत मिळणार आहे.
त्यामुळे शासनाने गडचिरोली येथील स्त्री व बाल रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लांट ला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.