नंदप्पा येथे पंचायत समिती उपसभापती श्नी महेश देवकते यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- आज दि ३१ मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त नंदप्पा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर या कार्यक्रमाचे उद्घाघटक जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्या हस्ते ध्वजारोहण व दीप ज्वलन करण्यात आले या कार्यक्रमात सोशल डिस्टेसींगचे तंतोतंत पालन करत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित  संतोष जाधव तुकाराम कुंडगिर डॉ.विजयकांत पोले,दिंडे सर, चितगिरे सर, तिरुपती कुंडगिर, गोपीनाथ कुंडगिर, रामराम शेळके प्रमोद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.