Top News

नागरिकांच्या इच्छेनुसार शुल्क घेऊन गर्दी कमी करा.

नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोविड-१९ च्या लसिकरण आणि तपासणी केंद्रावर नागरिकांच्या इच्छेनुसार शुल्क घेऊन गर्दी कमी करण्यात यावी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य लस उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केली आहे. 
           
       नुकतेच दि.५ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळूभाऊ धानोरकर आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात अनिल धानोरकर यांनी म्हटले आहे की, कोविड-१९ लसिकरण केंद्रावर टोकन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी कमी करण्याकरीता जे नागरिक शुल्क देऊन लस घेण्यास तयार आहेत, त्या नागरिकांची स्वतंत्र रांग तयार करण्यात यावी. तसेच जे नागरिक शुल्क देणार नाहीत, त्यांची वेगळी रांग तयार करण्यात यावी. यामुळे लसिकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. त्याचप्रमाणे अॅन्टिजेन आणि आरटीपीसीआर तपासणी केंद्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे येथे  सुद्धा शुल्क देणारांची व न देणारांची वेगवेगळी रांग तयार करण्यात यावी. त्यामुळे तपासणी केंद्रावरील गर्दी कमी होईल. नागरिकांच्या मर्जीनुसार शुल्क उपलब्ध झाल्याने शासनाससुद्धा लस उपलब्ध करुन देण्यास व तपासणीकरीता आर्थिक मदत होईल. 
                 

       तसेच जुलै महिन्यात १२ वी ची आॅफ लाईन परीक्षा असल्याने आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता १८ वर्षांखालील १२ वीच्या मुलांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन देण्यात यावी.अशीही मागणी धानोरकर यांनी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने