ग्रामपंचायत भामडेळी येथे विज सनियंत्रण उपकरण.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- देशात कोरोना ची महामारी सुरू असताना आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर असून वीज पडून जीवित हानी होऊ नये यासाठी गट ग्रामपंचायत भामडेळी व बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भामडेळी येथे ग्राम पंचायतीचे आवारात वीज सनियंत्रण उपकरण नुकतेच लावण्यात आले.

दीड ते दोन किमी अंतरावर पडणारी वीज हे सनियंत्रण उपकरण शोषूण घेईल. त्यामुळे जीवितहानी टाळता येईल.यावेळी सरपंच सुषमा जीवतोडे , उपसरपंच शामल नन्नावरे , ग्रामपंचायत कर्मचारी विनोद घरत ,संगणक परिचालक ईश्वर घोडमारे व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.