Top News

कोरोनाच्या काळात तालुक्यात बोगस डॉक्टराकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ?


Bhairav Diwase. May 7, 2021
सावली:- वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातुर-मातुर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या च्या भरोश्यावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून कोरोनाच्या काळातही ग्रामीण जनतेच्या जीवनाशी खेळ सुरु असताना, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न जरी ऐरनीवर असला तरी सध्याचा काळ हा कोरोनाने भयभीत करणारा ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयन्त केले जात असताना, या कामात सारी आरोग्य सेवा कामाला लागली. तालुक्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर, लसीकरण केंद्र कोविड वाहतूक सेवा अशी सारी व्यवस्था कामाला लागली असताना सुद्धा कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसते.

कोरोना विषाणूचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना त्यांचेवर नियंत्रण आणणे कठिन होत चालले असले तरी आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासन कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोणताही साधा ताप, सर्दी, खोकला असो कोरोनाच निघतो या बाबत मात्र तर्के वितर्क केला जात आहे. सध्या तर उन्हाळ्याचे दिवस सोबतच अधुन मधून मेघगर्जना धरून येणारा पाणी त्यामुळे तापाची साथ सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढलेले दिसते. यातही बदलत्या वातावरणाचा मनुष्य जीवावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातही कोरोनाची लाट! यामुळे जनजीवन भयभीत होताना दिसते उपचारा अभावि रुग्ण दगावल्याचे बोलले जात आहे. अशी भयावह परीस्थिति असताना तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरु असून ग्रामीण जनतेच्या जिवाशी खेळ केल्या जात आहे. थातुर मातुर उपचार करुण पैश्याची लुटमार केली जात आहे.
सरकारी दवाखान्यात जाल तर कोरोनात टाकल्या शिवाय राहणार नाही. अशी भीती बोगस डॉक्टरांकडुन सांगितली जात असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि तापाची साथ यामुळे सरकारी ते खाजगी दवाखाने गचागच भरलेली दिसतात. ग्रामीण जनतेचे आरोग्य निट राहावे त्यांना आरोग्याची योग्य सेवा मिळावी म्हणून गाव तिथे आरोग्य सेवेची निर्मिति केली गेली. लोकसखेचे प्रमाण पाहुन त्या-त्या ठिकाणी लक्ष रुपये खर्च करुन आरोग्य सेवेच्या ईमारती उभ्या केल्या. परंतु अपुऱ्या सोई, कर्मचाऱ्याचा अभाव आदी कारणास्त्व ग्रामीण जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी किवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागण्याची वेळ निर्माण झाली.
परिणामी याची सुवर्ण संधी पाहुन बोगस डॉक्टरानी ग्रामीण भागात आपले बस्थान मांडले खेळोपाळी आपला बोजा बिस्तारा घेऊन ग्रामीण भागात जाऊन आपली आरोग्य सेवा पुरविण्याचा सपाटा सुरु केला. आजच्या घडीला अनेक बोगस डॉक्टर ग्रामीण भागात फिरताना दिसता. सव्वालाख लोकसंख्या आणि एकसेअकरा गावाचा समावेश असलेल्या सावली तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय आणि सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु डॉक्टरांच्या हलगरर्जीपनामुळे गरीब रुग्णावर वेळेवर उपच्यार केला जात नाही? वेळेवर डॉक्टर कर्मचारी हजर राहून रुग्णावर उपच्यार करित नाही? असे नागरिकांन कडुन बोले जात आहे. त्यामुळे गरीब जनतेला खाजगी रुग्णालयात जाऊन माहागळा उपचार घ्यावा लागतो. परिणामी डॉक्टर आणि कर्मचारी विना दवाखाने काही अशी ओस पडल्याचे दिसते याचाही फायदा बोगस डॉक्टराना होत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचा व्यवसाय हा जवळपास सर्वच खेडेगावात सुरु असल्याचे दिसून येत असताना गावच्या मुखीया चे सुधा दुर्लक्ष होताना दिसते. तालुक्यातील बोथली, कवठी, जिबगाव, हरंबा, उसेगाव, लोडोली, जाँब, बुजरुक, गेवरा, अंतरगाव सह अनेक गावात बोगस डॉक्टरांची सेवा सुरु असून अश्या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते. अश्या बोगस डॉक्टरांच्या उपचारा दरम्यान एखादी रुग्ण दगावल्यास त्याचा सर्वस्वी जिमेदार कोण? असा प्रश्न निर्माण केला जात असला तरी तालुक्यातील बोगस डॉक्टरावर अंकुश घालण्यास संबंधित विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच तालुक्यात बोगस डॉक्टरांचे बस्थान वाढत चालले असून आपल्या बोगस आरोग्य सेवेतुन हे तकलिब बाबा मात्र मालामाल होताना दिसतात हे मात्र विशेष......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने