१६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि. फाले
सावली:- "रक्तदान हेच जीवनदान", "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" असे समजले जाते. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढी मधील साठा कमी पडू लागला आहे. तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करने आजच्या घडीला महत्त्वाचे आहे. आणि कोरोना काळात कमी होणारा रक्तसाठा लक्षात घेता उसेगाव येथे रक्तसेवा समिती चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात १६ जणांनी रक्तदान केले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चा पालन करून शिबीर पार पडले. शिबिरात संकलित झालेले रक्त सामान्य रुग्णालय गडचिरोली चा रक्तपेढीत जमा करण्यात आले.
स्वयं रक्तदाता समिती जिल्हा चंद्रपूर, गडचिरोली यांच्या वतीने आज दिनांक 20 मे 2021 ला ग्रामपंचायत कार्यालय उसेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सहकारी ब्लड बँक गडचिरोली टीम व उसेगाव येथील युवा आणि बाहेरून आलेले युवा मित्र यांच्या माध्यमातून रक्तदान करण्यात आला या शिबिरात 16 रक्तदात्यांनी रक्तदान केला या रक्तसेवा समितीचे उद्देश हेच की कुणालाही रक्ताची अडचण पडू नये रुग्णास तातडीने रक्तसेवा मिळेल या हेतूने गावागावात रक्तदाते तयार करून शिबिर घेतली जाते व गरजूंना मदत केली जाते.या शिबिराचे आयोजक डियम अरुण पाल, चारुदत्त राऊत जिल्हा अध्यक्ष रक्त सेवा समिती, व सहकारी मित्र राहुल सहारे, घनश्याम आभारे,शैलेश चौधरी, सुरज गोटपर्तीवार, साहिल पांडव,प्रफुल आभारे, नागेश बोरकुटे, पुरुषोत्तम मेश्राम, लखन भोयर, चेतन बोरकुटे, अनुभव पाल, एकनाथ शेंडे, कुंदन गेडेकर, स्वप्नील लोणारे, सचीन आभारे, अमित आत्राम, इत्यादी लोकांनी शिबिरात सहकार्य केले
"शिबिराचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झाला त्याबद्द मी रक्तसेवा समितीच्या वतीने रक्तदाते व सहकारी यांचे अभिनंदन डियम पाल यानी केले.