💻

💻

येनापुर परिसारत तेंदूपत्ता संकलनास प्रारंभ.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने देशात व राज्यात लाकडाऊन करण्यात आले. त्यामुळे रोजगार नसल्याने सर्व मजुरांचे काम बंद झाले होते. आणि मजुरांवर व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीवर उपासमारीची वेळ आली असल्याने अश्या परिस्थितीत तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने येनापुर परिसरातील येनापूर, दुर्गापूर लक्ष्मणपूर व मुधोली चक न ०२ ,मुधोली चक न ०१ व जयरामपूर, या परिसरातील मजुरांनी तेंदू पत्ता संकलन करून उपासमारीचा प्रश्न सोडविला आहे.
येनापुर परिसरातील बेरोजगार मजूर हे जोमाने जंगलातून तेंदूपत्ता गोळा करून राहिले आहेत. तेंदूपत्याच्या मिळालेल्या रक्कमेतून कुटुंबाचे पालन पोषण सुरु आहे. त्यामुळे त्यांना चांगली आर्थिक मिळकत मिळत आहे. संचारबंदीच्या काळात पोटाची खळगी भरणे हाच अनेकासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या परिस्थिती तेंदूपत्ता हंगामाच्या स्वरुपात रोजगार मिळाल्याने काही काळासाठी बेरोजगार मजुरांच्या परीवारात आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत