घरी परतलेल्या रूग्णांचे घरच्यांकडून स्वागत.

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- कोरोनाने बरा होऊन झालेल्यांचे स्वागत करण्यात येत आहे. हरीभाऊ नरचुलवार यांना कोरोना झाला. सावली येथिल कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची सिटी स्कॅन तपासणी करून कोरोनाचा स्कोअर तपासण्यात आला. कोरोना मध्यम स्वरूपाचा होता. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. सात दिवस ते कोविड सेंटर मध्ये भरती होते.
आठव्या दिवशी त्यांना सुटी देण्यात आली. पाॅझिटिव्ह रूग्ण सुखरूप घरी परतल्याने घरच्यानी व नातेवाईक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचे नातेवाईक विद्या‌ रायपुरे यांनी पीपीई किट सारख्या दिसणारा व पावसाळ्यात वापरण्यात येणारा रेनकोट, माॅस्क वापरुन त्या रुग्णांचे पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले.