Top News

बिबटच्या हल्ल्यात चितळ ठार.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- येथिल उपवनक्षेत्राला लागून असलेल्या किसान नगरीतील शेतशिवारातील नाल्यालगत बिबट्याने पाठलाग करून चितळाला ठार केल्याची घटना मंगळवारी ता. 11 मे सकाळी उजेडात आली.
जंगलातील पानवटे कोरडे पडले. त्यामुळे वन्यप्राणी आत पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहेत. पाण्याच्या शोधात आलेल्या चितळाला बिबट्याने ठार केले या घटनेची माहिती वनक्षेत्र अधिकारी कामडी यांना देण्यात आली. त्यानंतर व्याहाड खुर्द येथिल उपवन क्षेत्राचे वनपाल बुरांडे वनरक्षक पाडवी व वनमजुर हे घटनास्थळी हजर झाले‌
चितळाचा पंचनामा करण्यात आला. मृत चितळ आठ वर्षाची चितळ मादी असल्याने निष्पन्न झाले. दहा वर्षापूर्वी व्याहाड खुर्द फलोत्पादन परिसरात वन्यप्राण्यांच्या वावर अशा आशयाचे वृत सकाळने प्रकाशित केले. मात्र त्यानंतरही वनविभागाने कोणतीच उपयोजना केली नाही. या दहा दिवसात बिबट्याचा हल्ल्यातील दुसरी घटना आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने