जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन.

दुःखावर आईच्या मायेप्रमाणे फुंकर घालणाऱ्या रणरागिणींना मानाचा मुजरा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा अंतर्गत परिचारिका दिन साजरा करताना संपूर्ण जगात महाभयंकर कोविड-19 विरुद्ध मोठं युद्ध सुरु असताना केवळ रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून कुटुंबाची काळजी न करता जीवाची बाजी लावून युद्धभूमीवर पाय रोवून रणरागिणी परिचारिका लढा देत आहे. डॉक्टरांनी उपचार देऊन झाल्यानंतर रुग्णांची संपूर्ण सुश्रुषा करण्याचं महत्वाचे काम या परिचारिका करत असतात. डॉक्टरांपेक्षा रुग्ण हा जास्त वेळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो. रुग्ण पहिला परिचारिकाच्या संपर्कात येतो. आज जीवावर उदार होऊन परिचारिका कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याचं काम इमानेइतबारे करत आहे. कोविड युद्धामध्ये दुःखावर आईच्या मायेप्रमाणे फुंकर घालणाऱ्या या खऱ्या रणरागिणींना मानाचा मुजरा......
या कार्यक्रमात सहभागी डाँ. स्वप्नील गेडाम (MO) सर, श्रीमती एल डी नैताम आ स (f-ha), कु. एम पी. बोळणे(आ. सेविका), श्रीमती एस एच हालदार आ. सेविका, श्रीमती एम मेश्राम आ. सेविका, कु. मंजुषा बोळेवार (फ्लेबोटामिस्ट), कु. श्रुष्टी कोवले , सौ. कविता नर्मलवार मदतनीस, गणेश मडावी (कर्मचारी) , मेश्राम (कोविड योद्धा), श्री. अंगलवार सर (कनिष्ठ सहा.), श्री. बतकमवार (कनिष्ठ सहा.) इ. उपस्थितीत परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत