Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा लसीकरण सुरू करण्यात यावे- संतोष देरकर

Bhairav Diwase
आरोग्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली मागणी


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना नी आपले पाय पसरविले असून कोरोना हा संसर्ग १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना जास्त प्रमाणात आढळून आल्यामुळे काही दिवसापूर्वी राज्यात या वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यामुळे रुग्ण संख्या सुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आहे.
परंतु सध्या चंद्रपूर जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला असून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना तथा त्यावरील वयोगटातील नागरिकांना सुद्घा लसी साठी धावपड करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे, परंतु जर लसीकरण करणे बंद राहले तर राज्यात रुग्ण संख्या आणखी वाढू शकते.


करिता १८ वर्ष वयोगटा वरील संपूर्ण नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यात तथा राजुरा तालुक्यात योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा सुरू करून लसीकरण पुन्हा सुरु करण्यात यावे.
या करिता राजुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री. नामदार श्री राजेश टोपे यांना ई मेल द्वारे निवेदन पाठऊन मागणी केली आहे.