Top News

इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून वनविभाग नर्सरी मार्गाची स्वच्छता.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शहरातील इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून शहरालगत असलेल्या वनविभागाच्या नर्सरी मार्गाची स्वच्छता करण्यात आली. या मार्गावरील काचेच्या व पाण्याचा रिकाम्या बॉटल्स, वेफर्सचे प्लास्टिक आवरण व अन्य पदार्थ जमा करण्यात आले. या मार्गावर पहाटे आणि सायंकाळी मैदानी खेळाचा सराव करणार मुलं, व्यायामासाठी येणार वृद्ध यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


शहरालगत वनविभागाची मोठी नर्सरी व लकडा आगार आहे. हा परिसर शांत व वृक्षानी बहरलेला आहे. या परिसरात पहाटे व सायंकाळी अनेक आबालवृद्ध आणि सैन्य भरतीची तयारी करणारे युवक सरावासाठी येत असतात. मात्र येथे दुपारच्या व रात्रीच्या वेळीचा एकांताच फायदा घेत आंबटशौकीन आपले शौक पूर्ण करायला येतात. तिथेच दारूच्या रिकाम्या बॉटल्स, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स, वेफरचे आवरण असे पदार्थ फेकून देतात. यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना तर त्रास करावाच लागतो. मात्र पर्यावरणाचा ही ऱ्हास होत आहे. ही सर्व समस्या बघून इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत शुक्रवार रोजी सांयकाळी या मार्गावरील स्वच्छता केली. यावेळी जवळपास तीन चुंगड्या दारूच्या खाली बॉटल्स जमा झाल्या. सोबत अन्य कचरा ही जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.


या मोहिमेत चेतन सातपुते, सतिश बानकर, जगदीश साठोने, आकाश वाटेवर, भुपेंद्र साठोने, बबलू चव्हाण, प्रज्वल उराडे, राहुल पिदूरकर, विकी भोज, दिनेश ठाकरे, पवन पिंपळशेंडे, शुभम सोयाम, बंडू बोडे, पचारे, अक्षय गावंडे आदीं युवकांनी सहभाग घेतला. तसेच या ग्रुप कडून किमान १५०० वृक्षलागवडीचे लक्ष ठेवून १५ ते २० जून रोजी वृक्षारोपण मोहीम ही राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने