जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

गडचिरोलीतील दारूबंदी उठविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- ठाकरे सरकार आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्यानंतर आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा विचार करत आहे. चंद्रपूरची दारुबंदी सफलतेने उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही दारुबंदी उठवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. चंद्रपूरची दारुबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
तर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घ्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर वडेट्टीवार यांनी दारुबंदीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागली.
दारुबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे काहीही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही. तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी तिखट टीकाही त्यांनी केली. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली, तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या दारुबंदीला उठवण्याची एकप्रकारे तयारीच केल्याचे दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत