जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

चेक आष्टा येथे 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड-19 लसीकरण.

जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांची लसीकरणाला भेट व मास्क चे वाटप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज दिनांक 29/5/2021 ला सकाळी 11:00 वाजता आरोग्य विभागा तर्फे ४५ वर्षावरील नागरिकांना कोविड-19 चे प्रतिबंधात्मक लसीकरण देण्यात आले. या लसीकरण शिबिराला जिल्हा परिषद चे सदस्य राहुल संतोषवार यांनी भेट दिली. माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून मास्कच वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील जनतेमध्ये उत्स्फूर्तपणे लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी सर्व नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. नेहमी मास्क चा वापर करावे, सॅनिटायजर, साबून ने सतत स्वच्छ हात धुवावे, विनाकारण बाहेर फिरू नये. असे आवाहन त्यांनी केले. या शिबिराला सरपंच कांता मडावी, माजी सरपंच, सदस्य जयंत पिंपळशेंडे, सदस्य सरिता मरसकोल्ले, मुख्याध्यापक याम्मावार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत