Top News

पालकमंत्री ना.विजय वडेटटीवार यांनी घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिवपिंडीचे दर्शन.


रस्त्यासाठी खनिज निधितुन 60 लाख देत असल्याची घोषणा.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- देवटोक येथे उत्खनांत मिळालेले शिवपिंडी ही पुरातन असून हे क्षेत्र धार्मिक तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी येण्यासाठी रसत्याला खनिज विकास निधितुन 60 लक्ष देत असल्याची घोषणा करित शिवपिंडी दर्शन घेवून आनंद झाला असून पुढेहि येथे येत राहणार असे पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी भेटी दरम्यान म्हटले.
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे दिनांक 25 ला सायंकाळी 6 च्या दरम्यान नवीन मंदिर बांधकाम करण्यासाठी कॉलम चे जेसीपी च्या खोदकाम करीत असतानाच जवळपास अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंच ची पुरातन शिवपिंडी आढळून आली. त्या शिव पिंडी ची विधीवत पूजा करण्यात आली.शेकडो लोकांनी ही शिवपिंडी पाहण्यासाठी गर्दी करित आहे. आज दिनांक 28 ला दुपार 4 च्या सुमारास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी देवटोक येथे भेट देत पाहणी केली व पूजा अर्चना केली.तसेच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.वैनगंगा नदी काठावरिल हे पावन स्थळ असून मार्कण्डेय ऋषि यांचे वडील श्री मुरकेन्डेश्वर ऋषि यांचे स्थान आहे.यासाठी भरपूर निधि उपलब्ध करुण देवू असे ना.विजय वडेटटीवार यांनी या प्रसंगी म्हटले.
पालकमंत्री ना. वडेटटीवार त्यांच्या समवेत कांग्रेस जेष्ठ नेते संदीप गड्डमवार, खनिज महामंडळ सदस्य दिनेश चिटनुरवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, माजी सभापती राकेश गड्डमवार,कांग्रेस अध्यक्ष बंडू बोरकुटे, युवा अध्यक्ष नितिन दुव्वावार,राजू सिद्धम,जिबगांव येथील प्रभारी ग्रा प सरपंच पुरुषोत्तम चुदरी,ग्रा प सदस्य व म गां त समीती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार, मनोज चौधरी, श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक(शिर्शी) चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज,उपाध्यक्ष पत्रुजी चुधरी,सचिव नरेश जकुलवार, गुणाजी ठोम्बरे,सुरेंद्र उरकुडे,सुरज बोम्मावार, पुंडलिक पाल,नामदेव हजारे,भास्कर पोहनकार,नीलकंठ फाले यावेळी उपस्तीत होते. यावेळी ट्रस्ट च्या वतीने स्थळाच्या विकासासाठी निधी मंजूर करावे या साठीचे पालकमंत्री ना.वडेटटीवार यांना निवेदन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने