मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोना काही अनाथ झालेल्या मुलांसाठी नविन योजना.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. May 29, 2021
नवी दिल्ली:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मृत्यूदर जास्त आहे. याकाळात बऱ्याच चिमुकल्यांचे पोषणकर्ते दुरावले आहेत. कुणाच्या वडिलांना तर कुणाच्या आईला कोरोनाने हिरावले आहे. काही मुलांचे तर दोन्हीही पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. या अनाथ झालेल्या मुलांसाठी आता केंद्र सरकारने तरतूद केली आहे. या मुलांना पीएम केअर फंडातून मदत मिळणार आहे.
अनाथ मुलांसाठी नवीन योजना-

पंतप्रधान मोदींनी जी मुले कोरोनाकाळात अनाथ झाली आहेत त्यांच्यासाठी 'PM-CARES for Children' ही योजना आणली आहे. याद्वारे अनाथ मुलांसाठी तरतूद केली जाणार आहे. या मुलांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. ही मदत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मिळणार आहे. तर वयाच्या २३ वर्षाच्या नंतर १० लाखांची मदत या फंडातून मिळणार आहे.
तसेच या अनाथ मुलांचा आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे. ज्याचे हप्ते PM CARES मधून दिले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले आहे.