जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी हिरापूर येथे कार्यक्षम तहसीलदार परीक्षित पाटील यांची नाकरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- सद्या कोविड 2019 ने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे यात ग्रामीण भागही अपवाद नाही. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण दिसून आले. शासनाने गावागावात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील लोक लशिकरणासाठी घाबरत होते. आज दिनांक 29 मे 2021 ला हिरापूर येथे लसीकरण घेण्यात आले सुरुवातीला लोकांचा सहभाग अल्प होता.
तेवढ्यात सावलीचे तहसीलदार साहेब परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे, यांनी हिरापूर येथे लसीकरण केंद्राला भेट दिली भेटीदरम्यान लोकांचा प्रतिसाद अल्प असल्याचे दिसून आल्यानंतर तहसीलदार परीक्षित पाटील यांनी प्रत्यक्ष लोकांच्या घरी गेले क्षणात संपूर्ण हिरापूर गाव पिंजून काठला आणि कोरोना लस लोक का घेत नाहीत याची माहिती लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोरोना लसीचे महत्त्व प्रत्यक्ष लोकांना घरोघरी जावून समजावून सांगितले.
   
      नागरिकांनी तहसीलदार परीक्षित पाटील साहेब यांच्या आवाहनाला व मार्गदर्शनाला दाद देत कोविडची लस घेण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि जवडपास 42 लोकांनी लस घेतली.
     
    दरम्यान सावलीचे तहसीलदार यांनी कोविड 2019 च्या काळात अनेक लोकपयोगी धोरण आखली आहेत. मागील आठवड्यात त्यांनी राईस मिल, गुरुबशनी,व इतर सामाजिक मान्यवराकडून कोविड 2019 साठी मदत मागितली होती व नागरिकांनी सुध्दा परीक्षित पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता आज पुन्हा एकदा हिरापूर येथे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या सामाजिक कार्याचा परिचय हिरापूरकरांना झाला त्यामुळे गावात आनंद व्यक्त केल्या जात आहे
                     
          यादरम्यान नायब तहसीलदार सागर कांबळे, संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे,डॉ. विवेक यमजलवार यांनी लोकांना मार्गदर्शन केले यावेळी हिरापूर ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रीती गोहणे, उपसरपंच शरद कंनाके, युवक नेते संजय सायंत्रावार, तालुका काँग्रेस चे सरचिटणीस नितीन गोहणे, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत