जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांच्याकडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- तालुक्यातील नारंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे विविध विकासकामे मंजूर करण्यात यावे याकरिता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केली आहे.
नारंडा येथे यापूर्वी सुद्धा कोट्यावधी रुपयांची विकासकामे माजी वित्त ,नियोजन व वने मंत्री तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे,व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातुन अनेक विकासकामे करण्यात आली.
मौजा नारंडा येथे स्मशानभूमी शेडला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे,सामाजिक सभागृहा समोर पेव्हर ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृहाच्या बाजूला किचन शेडचे बांधकाम करणे इत्यादी कामांची मागणी जिल्हा निधी सन २०२०-२१ अंतर्गत करण्यात आलेली आहे. सदर विकासकामे मंजूर झाल्यास गावातील नागरिकांना विकासात्मक सोयी सुविधा निर्माण होण्यास मदत होईल.
आपण सदर विकासकामे लवकरात लवकर मंजूर करू असे आश्वासन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी दिले.