Top News

विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे

बिइंग डिझायर बहुउद्देशीय संस्थेची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सध्या संपूर्ण देशात कोविड-19 या महामारीने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेकांना आपला रोजगार , व्यवसायाला मुकावे लागले.हातचा रोजगार गेल्याने जीवन जगण्याचे मोठे संकट समोर उभे असतांनाच आपल्या पाल्याना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न बघणार्या पालक वर्गापुढे विद्यापीठच्या शैक्षणिक शुल्काचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
गोंडवाना विद्यापीठाची पार्श्वभूमी ही आर्थिक, सामाजिक घटकांची प्रगती करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता झाली असून या परिस्थितीत परीक्षा शुल्क कमी करून विद्यार्थी वर्गाला आधार देण्याची मागणी संस्थेने राज्याच्या मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व विद्यापीठाला वारंवार केली आहे.
गोन्डवाना विद्यापीठाने योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आधार देत परीक्षा शुल्क कमी करावे अशी विनंती अक्षय डाकरे , दत्ता पुरोहित, अंशुल चामलवार, निखिल पटकोटवार, प्रथमेश दानव, गजु नागपुरे, रोशन नगराळे यांनी केली आहे निवेदनाद्वारे केलेली आहे.यावर नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे विध्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने