जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.

"त्या" जखमी महिलेचाही मृत्यू

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:-मूल तालुक्यातील जानाळा येथील कीर्ती रामदेवराव कुडमेथे (24) या इसमास आज 10 वाजताच्या सुमारास वाघांनी ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार कीर्तीराम आपल्या जवळच्या एका नातेवाईकांसह आपल्या शेतात गेला असता वाघांनी किर्तीरामवर हल्ला केला. सोबतच या इसमाने कीर्ती रामला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु वाघ त्याच्या अंगावर धावून आल्याने तो पळून फोनवर गावकऱ्यांना ही माहिती दिली. मृतक कीर्तीरामचे पश्चात पत्नी दोन मुले असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
"ती" जखमी महिलाही मृत......
दोन दिवसांपूर्वीच जाणारा येथील एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असतानाच ती मरण पावल्याची आज दुःखद घटना घडली. मृतक महिलेचे नाव वनिता वसंत गेडाम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत