Top News

गुप्त माहीतीच्या आधारे पोलीसांची दारु विक्रेत्यावर धाड.

42 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त; दारू विक्रेत्याचे ढाबे दनानाले.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- कोरोनाच्या काळात दुसऱ्या वर्षी लाकडाऊन सुरु आहे, संचारबदीत प्रवासी वाहतुक बंद असताना सुध्दा तालुक्यासह सावली मुख्यालयात मोठ्या प्रमाणात देशी,विदेशी,मोहफुलाची दारु विक्रीला उधाण आली आहे, अनेक ठिकाणी छापे मारुनही लहान मोठ्या कारवाहीला न जुमानता दारु विक्रेत्यांनी आपला बेधुंद दारु विक्रीचा धंदा सुरुच ठेवला आहे. अशातच नुकताच गुत माहीतीच्या आधारे सावली नगरातील एका दारु विक्रेत्यावर धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा पकडण्यात आला.
या कारवाईत 90 ML 40 नग टिल्रु, आर एस 90 ML 27 नग, डमरी फिशर 90 नग, एम डी 80 नग असे एकुण 236 नग एकुण किंमत 42 हजार 900 रुपयांचा माल दारु विक्रेत्याचा घरी रात्री धाड टाकुन पकडण्यात आला. अवैद्य दारु विक्रेता सारंग उर्फ युवराज कुंभारे(३५) वर्ष सावली यांच्या विरुध्द 65 ईं मोदाका अंतर्गत कारवाही करण्यात आली.

राज्यासह देशात कोरोनाच्या दुस-या टप्प्यात राज्यात कोरोना बाधीताची व मृत्यु चे प्रमाण वाढत असताना संचारबंदीच्या काळात पोलीस विभागाची भुमिका योग्य दिसत आहे ,लोकांना गर्दी करु नये ,वाहन तपासणी असे कार्य पोलीस करीत असताना मात्र याचा फायदा घेत अवैद्य दारु विक्रेते बिनधास्त दारु विक्रीचे काम करीत आहे रात्रिच खेल चाले या शुभासिता प्रमाणे दारुचि विक्री जोमात सुरु आहे त्यामुळे पोलीस विभागाला कोरोना च्या काळात अवैद्य विकरिवर अकुंश लावणे कठीण होतं चालले आहे.
                   
       नुकतीच गोपनिय माहीतीच्या आधारे एका अवैध दारु विक्रेत्यावर कारवाही करण्यात आली यामुळे तालुक्यासह सावली शहरात दारु विक्रेत्याचे धाबै दणाणले‌ आहे
                     
        सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय वासनिक, एस आय बोधे, पो.शी स्वप्नील , निलेश ,श्रीकांत दिपक डोंगरे यांनी कारवाही केलीअसून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने