अखेर सुनील उरकुडे कृषी व पशुसंवर्धन सभापती जि. प. चंद्रपूर यांच्या गोवरी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मागणीला यश

Bhairav Diwase
पहिल्याच टप्प्यात येणार 200 लस.

सुनील उरकुडे यांच्या या कार्यामुळे गावातील जनता घेणार गावातच लस.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. परिणामी रुग्णांच्या तूलनेत खाटांची संख्या कमी पडत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या कोरोनाला आळा बसला पाहिजे या उद्देशाने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. परंतु या लसीकरणापासून ग्रामीण भागातील लोक वंचित आहे. लसीकरण घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंद करावी लागतात. या लसीकरणाचा लाभ गोवरी गावातील व्हावा याकरिता जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मा. सुनीलभाऊ उरकुडे यांनी लसीकरण केंद्र गोवरी येथे सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर सुनीलभाऊ उरकुडे यांच्या मागणीला यश मिळाले असून पहिल्याच टप्प्यात 200 लस येणार आहेत.