जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

ग्रामपंचायत चेक ठाणेवासना ने घेतला गावात "जनता कर्फ्यु" चा निर्णय.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने आज झालेल्या मीटिंग मध्ये उद्या दिनांक 12/05/2021 सकाळी 11 वाजेपासून 16/05/2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी चेकठाणेवासना गावामध्ये "जनता कर्फ्यु" लावण्यात येत आहे.
यादरम्यान खालील गोष्टी बंद राहील:-
१) सर्व किराणा दुकाने
२) सर्व पानठेले
३) पिठगिरणी
४) कापड दुकाने इत्यादी


यादरम्यान सुरू राहतील:-
१) दवाखाना व मेडिकल स्टोअर (फक्त गावातील व्यक्तींसाठी)
जनता कर्फ्यु कालावधी मध्ये विनामास्क विनाकारण फिरत असताना कोणीही आढळून आल्यास 200 रुपये आणि किराणा दुकाने तथा तत्सम आस्थापने (पानठेले), पिठगिरणी, सलून, रेशन दुकान उघडे दिसल्यास अथवा लपून छपून विक्री करताना आढलून आल्यास 5000/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

त्याचबरोबर बाहेर गाऊन येणाऱ्या पाहुण्यांना, फेरीवाल्यांना, भाजीपाला विक्रेत्यांना, कामगारांना/मजुरांना गावामध्ये प्रवेश बंदी असेल उल्लंघन केल्यास सबंधिताकडून प्रति व्यक्ती 200 रुपये दंड आकारण्यात येईल.

तरी गावातील सर्व नागरिकांनी Break The Chain मिशन ला स्वयंस्पुर्तीने सहकार्य करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत