जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

प्रीती बोंद्रे यांचे नियमबाह्य संवर्गातील अवनत केलेले सहआयुक्त पद रद्द करा.

नारायणराव जांभुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती

भद्रावती:- कोणतीही गरज नसताना नियम धाब्यावर बसवून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय नागपूर येथे अमरावती येथील उपसंचालक प्रीती बोंद्रे यांची सह आयुक्तपदी केलेली पदस्थापना रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस नारायणराव जांभुळे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

    विशेष म्हणजे ही पदस्थापना कनिष्ठ वेतन श्रेणीवर करण्यात आली आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नारायणराव जांभुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.अनुसूची जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत पदस्थापने संदर्भात अनेक घोळ दिसून येतात. असाच प्रकार नागपूर येथे घडला आहे. अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती येथे उपसंचालक म्हणून कार्यरत प्रीती बोंद्रे यांना नागपूर येथे २६ जुलै २०२० रोजी सह आयुक्त पदावर, पद अवनत करुन तात्पुरती पदस्थापना देण्यात आली. वास्तविक त्यांचे पद उपसंचालक आहे.या आदेशात त्यांची वेतन श्रेणी अवनत करण्यात आली. जेव्हा की वर्ग एक मध्ये मोडत असलेल्या पदाची वेतनश्रेणी अशाप्रकारे अवनत करणे नियमाला धरून नाही. तरी सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या विशेष मर्जीने हा निर्णय घेण्यात आला. विभागात इतरत्र अधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना नागपूर कार्यालयात उपसंचालक  एकाच श्रेणीचे दोन अधिकारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सह आयुक्त पदाकरीता विभागात पात्र अधिकारी असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे हा गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जांभुळे यांनी केली आहे.

प्रीती बोंद्रे गडचिरोली येथे रुजू न होता एक वर्ष गैरहजर....

अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रीती बोंद्रे ह्या अनुसूची जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय अमरावती येथे संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. पदोन्नतीनंतर त्यांना याच कार्यालयात उपसंचालक पदी बढती देण्यात आली. बरीच वर्ष येथे कार्य केल्यानंतर त्यांची ३० ऑगस्ट २०१९ रोजी गडचिरोली येथे उपसंचालक या पदावर बदली करण्यात आली. मात्र त्या रुजू झाल्या  नाहीत. नागपूर येथे पदस्थापना होईपर्यंत त्या वर्षभर बेकायदा गैरहजर होत्या. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांना अभय देणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी देखील तक्रार जांभुळे यांनी केली आहे.

शासनाच्या परिपत्रकाची अवहेलना....

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग-शासन निर्णय-परिपत्रक क्रमांक एसआर व्ही-2010 प्र.क्र. 279/9/2010/12,दि.28.10.2010 नुसार,गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त पदे,सर्वोच्च प्राधान्याने तात्काळ भरणे आवश्यक असल्याने, परिपत्रकाप्रमाने बदलीच्या आदेशापासुन 10 दिवसांत रुजू व्हायला पाहिजे होत्या.प्रीती बोंद्रे गडचिरोली येथे जवळ पास वर्षे रुजू न झाल्याने,त्यांचे विरुद्ध म.ना.से (शिस्त व अपिल)1979 मागिल नियम 4 नुसार कारवाई करण्याची मागणी सुध्दा जांभुळे यांनी केली आहे.

रिक्त पद भरा.....

विभागातील अनेक कार्यालयात रिक्त पद असल्यामुळे पडताळणीच्या कामात दिरंगाई होत आहे. गडचिरोली येथे उपसंचालक हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने तेथील नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बोंद्रे यांची बेकायदेशीर पदस्थापना रद्द करून त्यांची गडचिरोली येथेउपसंचालक पदावर बदली करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या  निवेदनातून जांभुळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत