नगर परिषद व पोलिस विभागाची धडक कारवाई.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहर कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याच्या पार्श्वभूमिवर येथील नगर परिषद आणि पोलिस विभागाने सुरु केलेल्या धडाकेबाज कारवाईचे शहरात स्वागत केले जात आहे.

दिवसागणिक भद्रावती शहरात आणि तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्राणवायू, खाट, औषध न मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य विभाग व प्रशासनावरही ताण निर्माण झाला आहे. असे असतानाही नागरिकांकडून कोविड नियमांचे संचार बंदीचे सर्रास उल्लंघन होत होते. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदन देऊन भद्रावती शहरातील संचारबंदी आणखी कडक करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जगदिश गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तर संचारबंदीचे उल्लंघन करणा-यांना पोलिसांचा प्रसाद मिळत आहे.