जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

सागवान चोरीप्रकरणात पाच जणांना अटक.

१९ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत घोसरी बिटातील चेक घोसरी- थेरगाव वनात वनकर्मचारी गुरुवारी रात्री गस्त करीत असताना सागवान लाकडाची चोरी करताना पाच आरोपीकडून १९ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही आरोपींना अटक करण्यात आली.

घोसरी वन बिटात वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनक्षेत्र अधिकारी अरुण पलिकोंडावार, नियत क्षेत्र वनरक्षक राजेंद्र लडके व वन कर्मचारी हे रात्री गस्त करीत असताना कक्ष क्र.५४६ मध्ये वकील नामदेव झाडे, मनोज ईश्वर वनकर, विनाजी कोल्हू थेरकर, कुमार नामदेव वनकर, सुरेश फकिरा फुलझेले सर्व रा. चेक घोसरी हे सागवानाची चोरी करीत होते.

त्यांना रंगेहात पकडून एकूण १९ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली. पुढील तपास वन अधिकारी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत