जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

आसिफ सय्यद यांच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात घोषणाबाजी व निषेध.

---तीव्र आंदोलनाचा इशारा---


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- पेट्रोल डिजेल व घरगुती गॅस ची दरवाढ दिवसेंदिवस वाढत असून, आधीच कोरोना मुळे आर्थिक अडचणीत पडलेल्या जनतेला दिलासा मिळायच्या ऐवजी यामध्ये दरवाढ झाल्यामुळे आता सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाचे भाव प्रती बरल घसरत असून सुद्धा आपल्या देशात पेट्रोल चे भाव आगी प्रमाणेच चढत आहेत याचा सर्वात जास्त फटका मध्यम वर्गीय परिवाराला तसेच शेतकरी वर्गाला होत आहे.
सत्तेत यायच्या आधी दर वर्षी बेरोजगारांना 2 करोड रोजगार देऊ म्हणून सत्तेत आले होते परंतु या उलट सध्या देशात बेसुमार बेरोजगारी वाढलेली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी राजुरा तर्फे सोंडो येथे आज केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिजल गॅस दर वाढ, शेअर बाजार, बेसुमार वाढलेली बेरोजगारी, आकाशाला भिडलेली महागाई च्या विरोधात ग्राम पंचायत कार्यालय जवळ राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेस पार्टी राजुरा द्वारा केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर ,युवक तालुका अध्यक्ष असिफ सय्यद, राजुरा युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, मंगेश वडस्कर, गोपाल बोलूवार, समीर सय्यद, साई जिटापेंनावार, सुजेन सय्यद सुजल हजारे व मनोज गेडाम तथा सोंडो येथील गावकरी व असंख्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत