Top News

दारू माफियांचा पोलिसांनी केला फिल्मी स्टाईल पाठलाग.

अवैध दारुसहित 12 लाख 53 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दि. 28/05/2021 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील ठाणेदार घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व पोलिस सोनुले, राहुल रहाटे,मंगेश श्रिरामे ,अरविंद मेश्राम यांनी एक डस्टन गो मोटार कार किंमत 6 लाख, त्यामध्ये 240 विदेशी दारू असलेल्या काचेच्या बाटली 180 मिली ने भरलेल्या किंमत 96,000/- असा एकूण 6,96,000 / - रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
दुसरे वाहन- एक टाटा इंडिगो मोटार कार किंमत 5 लाख त्यामध्ये 144 नग विदेशी दारू असलेल्या काचेच्या बाटल्या मध्ये 180 मिलि ने भरलेल्या किंमत 57,600,/- रुपये असा एकूण 5,57,600/- रुपयांचा माल मिळून आला.
असा दोन्ही गाडी व नमूद माल किंमत 12,53,600/- रुपयांचा मालं मिळून आल्याने तीन फरार आरोपी वर सिंदेवाही पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास ठाणेदार घारे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने