जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

दारूबंदी हटवण्याचा विदर्भ राज्य आंदोलन समिती जिवती तर्फे जाहीर निषेध.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेली दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी लोकविरोधी असल्याची टीका करीत या निर्णयाचा विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ महिला आघाडी व विदर्भ युवा आघाडीने निषेध केला आहे.


हा निर्णय घेतांना राज्य सरकारने दिलेले अवैध दारूविक्री व गुन्हेगारी हे कारण सरकारच्या अकार्यक्षमतेचे द्योतक आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून लोकांच्या आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहे. कोरोना काळात लोकांना विरोध करण्याची संधी मिळू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांचा आणि महिलांचा प्रचंड विरोध असतांना हा दुर्दैवी निर्णय घेण्यात आल्याचे मत वि.रा.आ.स. व्यक्त केले आहे.
या लोक विरोधी निर्णयाचा विदर्भ आंदोलनाचे नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप,सुदामभाऊ राठोड(जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर) , योगेश मुर्हेकर, विशाल राठोड,सुनील राठोड,अरविंद चव्हाण, अविनाश उके,ईश्वर सहारे, विनोद पवार,श्रीराम जाधव, लक्ष्मण खुटेकर, सुरज राठोड, देव पडोळे,यांचेसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत