💻

💻

घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे मित्र परिवारातर्फे घुग्घुस शहरात मोफत ऑक्सीजन सेवा सुरू

घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले विविध सामाजिक उपक्रम


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
घुग्घुस:- सर्वांच्या मदतीला अहोरात्र धावून जाणारे भाजपा जिल्हा महामंत्री तथा घुग्घुस शहराध्यक्ष श्री. विवेक बोढे सरांचा वाढदिवस 11 मे रोजी कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात देऊन साजरा करण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस शहरात
विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाची सुरवात घुग्घुस येथील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश कोल्हे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली.


यावेळी विविध सामाजिक उपक्रम प्रामुख्याने राबविण्यात आले
ऑक्सीजन सेवा सुरू
रुग्णांना भरती करण्यासाठी रुग्णालयात वेटिंगमध्ये 24 तास राहावे लागत आहे. अशा रुग्णांचा ऑक्सिजन लेवल कमी होऊन रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे.

ऑक्सीजन ॲम्बुलन्स सेवा
कोराना रूग्णांना मदतीसाठी ऑक्सीजन ॲम्बुलन्स
सेवा दीदार गॅरेजचे संचालक श्री. दिलशाद शेख यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली.

पि.पि. ई. किट वाटप
श्री. मानस रत्नेश सिंग यांच्या माध्यमातून रुग्णालयात पि.पि. ई. किट वाटप करण्यात आले.
एक हजार फेस शिल्ड वाटप व दोन हजार N95 मास्क वाटप
रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी नेहमी मदत करणाऱ्या ऑटो चालकांना तसेच वाहन चालकांना
फेस शिल्ड वाटप व N95 मास्क वाटप करण्यात आले.

धान्य किट वाटप
मोमीन शेख मित्र परिवारातर्फे विवेक सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कोरोणाग्रस्त कुटुंबांना धान्य किट वाटप करण्यात आले.
सेनीटायझर मशीन भेट -
माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्रात मित्र परिवारातर्फे सेनीटायझर मशीन लावण्यात आली.

सोसियल डिस्टन्ससिंगचे पालन करत हया सर्व उपक्रमांची सूरवात करण्यात आली.

या सर्व उपक्रमांचा लाभ नागरिकांनी तसेच रुग्णांनी घ्यावा असे आवाहन मा. देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे करण्यात आलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत