कुंभार समाजास काही दिवसाकरिता व्यवसायास परवानगी द्या:- अविनाश पाल.

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- कुंभार समाज हा मातीचे विविध वस्तू विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण कि एकीकडे कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरलेले आहे. त्यामुळे कुंभार समाजाने बनविलेल्या मातीच्या वस्तू विकू शकत नाही. तसेच उन्हाळ्यात गरीबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला बनविणारा कुंभार समाज हा कोरोनामुळे रिकामा बसलेला आहे. नागरिकसुद्धा या माठाची आतुरतेने चातकासारखी वाट बघत आहेत.
ग्रामीण भागात साजरी केली जाणारी तीज (अक्षय तृतीया) ह्या सणाला मातीच्या माठाची खूप आवश्यकता असते. परंतु कुंभार समाज कोरोनामुळे आपला सामान शहरात किव्हा ग्रामीण भागात विकू शकत नाही. जर कुंभार समाजाला आपला सामान विकू शकला नाही तर ग्रामीण भागात साजरी केली जाणारी तीज या सणाला काहीच महत्व राहणार नाही व आपली वंश परंपरागत चालत आलेली परंपरा मोडली जाईल. तीज हा सन १४ मे ला असल्याने कुंभार समाजाला १४ मे २०२१ पर्यंत कोरोनाच्या नियम व अटींना अधीन राहून कुंभार समाजाला माठ, घागर व इतर मातीचे वस्तू विकण्यास मुभा मिळावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष, तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा श्री अविनाश पाल यांनी मान. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत मागणी केलेली आहे.