Click Here...👇👇👇

संपर्क साधताच आ सुधीर मुनगंटीवार यांनी ऑक्सिजन कान्सट्रेटरसाठी पुरविले डिझेल.

Bhairav Diwase
कोरोना रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण.
Bhairav Diwase. May 11, 2021
पोंभुर्णा:- वीज तारा तुटल्याने काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन बंद पडल्याने रुग्णांची  गैरसोय निर्माण झाली. ही बाब काळताच ताबडतोब आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत ग्रामीण रुग्णालयात (नविन ईमारत) पोंभुर्णा जनरेटरसाठी लागणारे डीझेल उपलब्ध करून दिले.  त्यानंतर ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन सुरु झाली.  
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात (नविन ईमारत) पोंभुर्णा येथे उपचारासाठी ठेवण्यात येत आहे. काल सोमवारी  सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रोडवर झाडे तुटून पडली. त्यामुळे वीजतारा तुटल्याने काही काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. ज्या रुग्णांना ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन लावण्यात आली. त्यांना वीज खंडित झाल्याने आक्सिजन घ्यायला बाधा निर्माण झाली. 
पोंभुर्णा वासीयांकडून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची गंभीरता लक्ष्यात आणून देण्यात आली. ताबडतोब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत ग्रामीण रुग्णालयात (नविन ईमारत) पोंभुर्णा जनरेटर साठी लागणारे डीझेल उपलब्ध करून दिले. 
जागृत लोकप्रतिनिधी आ. सुधीर मुनगंटीवार यांची जागरूकता बघून कोरोनाने बाधित असलेल्या रुग्णामध्ये आनंदमयी वातावरण निर्माण झाले.