💻

💻

मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून घुग्घुस येथे दुसरे आरटीपीसिआर केंद्र मंजूर

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
घुग्घुस:- येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात उद्या मंगळवार 11 मे पासून कोरोना तपासणी करिता दुसरे आरटीपीसिआर तपासणी केंद्र मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणि भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु करण्यात येणार आहे.

सध्या शहरात कोरोनाने थैमान घातले आहे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत 800 च्या घरात गेली असून 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. घुग्घुस परिसरात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरटीपीआर केंद्रावर तपासणी करिता नागरिकांची मोठी गर्दी होत होती ही समस्या बघून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे पाठपुरावा केला त्याअनुषंगाने मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात कोरोना तपासणी करिता आरटीपीसिआर तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
यापूर्वी घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिले आरटीपीसिआर व अँटीजेन तपासणी केंद्र तसेच राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात कोविड लसीकरण केंद्र मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत