Top News

पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्वतः लक्ष घालून ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर उभारावे:- अतुल देशकर.


(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यात परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून ब्रम्हपुरीसाठीं 2 मिनी व्हेंटिलेटर आणि 10 जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. अतुल देशकर यांचा हा पुढाकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मदत ब्रम्हपुरीसाठी वरदान ठरत आहे. अनेक गंभीर रुग्णांना या मुळे आधार मिळाला. पण अशा परिस्थितीत क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे परिस्थिती कडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येते आहे. आढावा बैठकीच्या व्यतिरिक्त वडेट्टीवारांकडून या परिस्थितीसाठी कोणतेही मोठे पाऊल उचलले नाही. ब्रम्हपुरी येथे ऑक्सिजन प्लॉंट सुरू करण्याचा निर्णय घेतला पण प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होईल या बाबत संभ्रम आहे.

आता क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी आमदार तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः लक्ष घालून ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर उभाराव अशी मागणी केली आहे. ब्रम्हपुरी येथे कोविड सेंटरच्या उभारणी बाबत प्रा. अतुल देशकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा 18 एप्रिल रोजी पत्र लिहिले होते. या वर योग्य कार्यवाही करू असे उत्तर सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाले पण अजून यावर काही ठोस निर्णय आलेला नाही. माजी आमदार अतुल देशकर यांच्या विनंती वरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना ब्रम्हपुरी येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली आहे. या बाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र सुद्धा पाठविले आहे.

विजय वडेट्टीवार स्वतः पुनर्वसन मंत्री आहेत. त्यांनी स्वतः लक्ष घालून ब्रह्मपुरी येथे जंबो कोविड सेंटर सुरू करावे. यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असे माजी आमदार प्रा. देशकर बोलतांना म्हणाले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने