जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

आधी सांगितला रिपोर्ट निगेटिव्ह, दोन दिवसांनी सांगितला पॉझिटिव्ह.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- बाहेरून आलेल्या एका तृतीयपंथीयाने रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी केली. तिथे त्याला निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे सांगून घरी पाठविण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी फोन करून रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळविण्यात आले. यानंतर संतापलेल्या तृतीयपंथीयाने रुग्णालयात जाऊन कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

तालुक्यातील एक युवक तृतीयपंथी असून कामानिमित्ताने तो बिहारमध्ये होता. बिहारवरून गोंडपिपरीत आल्यावर सरळ ग्रामीण रुग्णालय गाठून कोरोना टेस्ट करवून घेतली. काही वेळानंतर त्याला रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तुम्ही घरी जाऊ शकता, असे सांगण्यात आले. निश्चिंत मनाने तो घरी गेला. नंतर दोन-तीन दिवसांनी फोन करून तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्याला कळवण्यात आले.

यावेळी मात्र संतापलेल्या त्या तृतीयपंथीने तडक ग्रामीण रुग्णालय गाठले. स्वतःच्या हक्काप्रति सजग असलेल्या त्या तृतीयपंथीने तेथील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अशा गलथान कारभारामुळे कोरोना पसरून लोकांचे जीव जात आहेत, असा गंभीर आरोपही त्याने केला. हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत