🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पुरोगामी पत्रकार संघ सिंदेवाही तर्फे भगवंतराव पोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सभा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील पुरोगामी पत्रकार संघ चे तालुका अध्यक्ष श्री भगवंत पोपटे यांचे covid १९ या आजाराने निधन झाले. त्याच पश्चात पुरोगामी पत्रकार संघ सिंदेवाही तालुक्याच्या वतीने शोक सभेचं आयोजन केले होते या शोक सभेला पोलिस स्टेशन सिंदेवाही चे पी एस आय श्री नेरकर साहेब रणधीर सर तसेच घारे साहेब यांनी फोन द्वारे शोक संदेश व्यक्त केला.
 नेरकर साहेबांनी आपल्या शोक संदेश मधून पोपटे साहेबांच्या पत्रकारिता ची प्रशंसा करीत आज च्या घडीला एक ज्येष्ठ व निर्भिड पत्रकार आपणास सोडून गेला या वर विश्वास बसत नसल्याचे सांगितलं पोपटे साहेब च पोलिस स्टेशन मधील सर्व कर्मचारी वर्गाशी आपुलकीचं नातं होत. रणधीर सर यांनी सुद्धा आपल्या शोक संदेशात पोपटे साहेब निर्भिड पत्रकार ला आज आपण मुकलो आहोत आज पर्यंत पोपटे साहेब नेहमी आमच्या सोबत सलोख्याचे संबंध होते.
घारे साहेबांनी आपल्या शोक संदेश द्वारे म्हटले की तालु्यातील शांतता समितीचे ते सदस्य होते व पोलिस वर्गाला नेहमी सहकार्य करीत असायचे.घारे साहेब यांनी आम्हाला फोन द्वारे संपर्क साधून शोक व्यक्त केला आमच्याशी बोलताना असे म्हणाले की पोपटे साहेब नेहमी माझ्याकडे यायचे माझी आपले काही अनुभव शेअर करायचे मी सुद्धा त्यांच्याशी आपले काही अनुभव शेअर करायचो.
पोपटेजी आज आपल्यात नाहीत आणि पण आजही मला असे वाटते की ते आपल्यात आहेत म्हणून समोर बोलताना ते म्हणाले की आम्ही नेहमी हसी मजाक करायची मी त्यांना प्रेमाने पत्रकार पोपटलाल असेही म्हणायचो आणि त्यांना ते खूप आवडायचं आणि ते आपल्या वडिल धा-या सारखे असल्यामुळे आपल्याशी हसी मजाक नेहमी होत राहायची आज ते आपल्यात नाहीये त्याची खूप दुःख आहे आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत