Top News

चितळाची अवैध शिकार करणारे दोन आरोपी वनविभागाच्या ताब्यात



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर वनवृत्तातील मध्य चांदा, वनविभागा अंतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रातील नियतवनक्षेत्रात अवैध शिकार करणाऱ्या सिरसी गावातील दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतलेले आहे. दिनांक 11 मे रोजी सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगत, राजुरा यांना गुप्त माहिती नुसार राजुरा वन परिक्षेत्रातील सिरसी नियतक्षेत्रात अवैध शिकार झालेली आहे. ही मााहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपल्या अधिनिस्त कर्ममचाऱ्यांना सोबत घेऊन सिरसी गावातील देवराव धर्मराव सिडाम यांच्या घरी जावुन घराची झडती घेतली असत्ता अंदाजे चितळाचे १० किलो मास आढळुन आले. मोक्यावर माँसाची विल्हेवाट लावतांना किशोर भाउराब तोडासे, वय. २४ वर्ष, हा आढळुन आला. त्याला त्याबाबत ताब्यात घेवुन मोक्यावरून चित्तळाचे माँस व मुंडके, सुरी २ नग, विळा १ नग कुऱ्हाड नग, जप्त करण्यात आले.
वन कर्मचारी येण्याचा सुगावा लागताच सहभागी आरोपी देवराव धर्मराव सिडाम, राजु देवराव सिडाम, अर्जुन किसन आत्राम, वासुदेव मारोतो सोयाम हे इसम मोक्यावरून पडुन गेले सवर आरोपी विरूध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २.९ .३९ , ५२,५६ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला. दिनांक १२/०५/२०२१ रोजी वरील आरोपी पैकी देवराव धर्मराव सीडाम राहणार सिरसी, हा सोडो येथे लपून असल्याची माहिती मिळाल्याने पहाटे ४ वाजता सोंडो येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले राजुरा येथे आणुन त्यांच्या विरुद्ध उचित कार्यवाही करून वनकोठळी घेण्यात आली
सदर कार्यवाई मध्य चांदा वन विभागाचे. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय वन अधिकारी गर्कल , यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगत यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक श्रीनिवास कटकू, पी आर मत्ते, ईश्वर रुद्रशेट्टी,वनरक्षक डी आर शेंडे,वनरक्षक सिरसी वर्षा वाघ,,वनरक्षक डी एम चंदेल,एस व्ही मेश्राम,आणि वन मजुरांनी केली आहे पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने