कोरोनामुळे मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यांना Imperial Classes Rajura, तर्फे IIT-JEE NEET चे मोफत शिक्षण.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मागील वर्षापासून करोना ने अक्षरशः सर्वच ठिकाणी हाहाकार माजवलेला आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना सुद्धा गमवावे लागले. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च कोण करणार हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.
   राजुरा येथे असणारे Imperial classes Rajura यांनी सामाजिक बांधिलकी पोटी पालकत्व गमावलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन IIT-JEE व NEET ( इंजिनीरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षा ) चे संपूर्ण दोन वर्षाचे शिक्षण मोफत देऊन त्यांची संपूर्ण तयारी करवून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
ज्यांनी आपले पालक गमाविले अश्या होतकरू  विद्यार्थ्यांचे  दुःख  समजून त्यांचे शिक्षण करणार असल्याची माहिती स्वप्नील पहानपटे यांनी दिली आहेत. Imperial classes rajura  चे कार्यालय samrat complex oppo. Nagraj cafe  येथे कार्यरत असून अधिक माहिती करिता स्वप्नील पहानपटे यांच्या 7083832605 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.