सावली:- सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरंगाव परिसरातील 17 ग्रामपंचायत व सोबत फॉउंडेशन चंद्रपूर र. न. चंद्रपूर /0000064/2021 संलग्नित जाणीव रुग्णालय गेवरा बुज. यांच्या माध्यमातून प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा येथे कोरोना पॅझिटिव्ह रुग्णांकरिता विलगीकरण कक्ष सुरवात करण्यात आली आहे.
परिसरातील नागरिकात असलेली कोरोनाची भीती नाहीशी व्हावी व स्वतःहून कोरोना तपासणी करिता प्रवुर्त व्हावे या उद्देशाने मा. तहसीलदार सावली यांच्या मार्गदर्शनाखाली विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले. या विलगीकरण कक्षाची पाहणी करण्याकरिता तहसीलदार मा. परीक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी गावळे, नायब तहसीलदार संजय कांबळे, डॉ. सुरज म्हस्के वैद्यकीय अधिकारी जाणीव रुग्णालय गेवरा बुज. पुरुषोत्तम नवघडे सरपंच निफंद्रा तसेच 17 ग्रामपंचायत पैकी 14 ग्रामपंचायत चे सरपंच उपस्थित होते, यावेळी सर्वांच्या सहकार्याने आपल्या परिसरातील रुग्णाची गैरसोय होऊ नये त्यांची व्यवस्था चांगली झाली पाहिजे असा मानस येथील सरपंच महोदयांनी व्यक्त केला.